सप्तशृंगी गडावरील अवैध दारू व धंदे बंद करा नाशिक ग्रामिण पोलीस अधिक्षक यांना पञकाराचे निवेदनाद्वारे मागणी

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.19नोव्हेंबर):; सप्तशृंगी गडावर कित्येक वर्षापासून अवैध धंदे विक्री होत असल्याने सप्तशृंगगड येथील पत्रकारांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देऊन दारूबंदी बाबत मागणी केली आहे श्री सप्तशृंगीगड हे अर्धेशक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र आहे याठिकाणी दररोज राज्य परराज्यातून दररोज लाखो भाविकांची वर्दळ चालू असते.

मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर या ठिकाणी चार ते पाच ठिकाणी अवैध दारु विक्री व गांजा विक्री होत असल्याने श्री आई सप्तशृंगीचे पावित्र्य नष्ट होत असल्याने ही बाब अत्यंत गंभीर आहे.तसेच अवैध दारूमुळे गडावरील वीस ते पंचवीस ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला आहे .
दारू पिऊन धुमाकूळ घालणाऱ्यांना गडावर येणाऱ्या भाविक भक्तांना मोठ्या त्रासांना सामोरे जावे लागते.यांसदर्भात नाशिक ग्रामिण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याकडे पत्रकरांनी निवेदन सादर केले आहे.याबाबत दारू विक्री सह परीसरात इतर अवैध धंदे विक्रीला आळा घालावा अशी अपेक्षा निवेदनात केली आहे तसेच पोलिस अधीक्षक सचिन पाटील एक कर्तव्यदक्ष व कणखर असे व्यक्तिमत्व असून आपल्या कार्याची प्रचिती नाशिक जिल्ह्यात असून याबाबत उपाययोजना करून सप्तशृंगी तीर्थक्षेत्राची पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

यापूर्वी सप्तशृंगी गडावरील रगरागिनींनी ( महिला) नि दुर्गाचा अवतार धारण करून सप्तशृंगी गडावरील अवैध दारूच्या संदर्भात वेळोवेळी मोर्चे काढून अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते व एक ते दीड वर्षे दारू देखील बंद झाली होती.पुन्हा एकदा अवैध दारू विक्रेते यांनी पुन्हा डोके वर काढल्याने सप्तशृंग गडावरती दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे .सप्तशृंगी गडावरील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी कळवण पोलीस नाखूश असल्याचे पाहवयास मिळत आहे याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कारवाई होऊन अवैध धंदे बंद होत नसल्याने आज सप्तशृंगी गड येथील पत्रकार यांनी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले आहे याबाबत पोलीस प्रशाशन काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सप्तशृंगी तीर्थ क्षेत्राचा सर्वत्र दारू विक्रीपर्यंत अवैध धंदे नागरिकांना दिसत असले, तरी पोलिसांच्या रेकॉर्डवर मात्र ‘निरंक’चा शेरा उमटतो आहे.नागरिकांना अवैध धंदे दिसतात आणि नागरिक त्यासंबंधी तक्रारी करतात. मात्र, पोलिसांना हे अवैध धंदे का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.अवैध दारू सहजासहजी उपलब्ध होत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे.परंतु या गोष्टीना पोलिसांचाच पाठबळ मिळत असल्याने अवैध व्यावसायिकविरुद्ध तक्रार तरी कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED