एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास “खूप लढलो बेकीने-आता लढुया एकीने”टीम व स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचा जाहिर पाठींबा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.19नोव्हेंबर):-चिमूर -‘खूप लढलो बेकीने, आता लढुया एकनेच’ संघटनेचा आणि स्वराज्य बांधकाम कामगार संघटना चिमुर येथे सुरू असलेल्या म.रा मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास जाहिर पाठिंबा दिलेला आहे.म.रा मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास ‘खूप लढलो बेकीने, आता लढुया एकीनेच’ टीम समर्थन देऊन त्यांच्या प्रत्येक लढ्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या आंदोलनात सहभागी होईल.

असे मत अतुलकुमार खोब्रागडे यांनी आंदोलकांना दूरध्वनी वरून बोलताना सांगितले.समर्थन पत्र सादर करतांना ‘खूप लढलो बेकीने, आता लढुया एकीनेच’ टीम चे ताजुल मेश्राम, सुमित मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम, संदेश रामटेके, कपिल खोब्रागडे आणि इतर सदस्य उपस्थित होते. तसेच स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष धनराज गेडाम, देवचंद टेंभुरणे जितेंद्र सहारे उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED