नवेगांव पांडव येथील वाचणालयातील विद्यार्थ्यांना नागभिड तहसीलदारांचे मार्गदर्शन ऍड. शर्मिला रामटेके मॅडम यांचा पुढाकार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभिड(दि.20नोव्हेंबर):-कोविड १९ चे लसीकरण १००% पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी गावोगावी जाऊन भेटी देत गावातील लोकांना लसीकरण करण्यासाठी प्रेरित करत आहेत.
नुकतीच ग्राम पंचायत नवेगांव पांडव येथे नागभिड चे तहसीलदार चव्हाण साहेब यांनी नवेगाव पांडव येथील नेवजाबाई हितकारी हायस्कूल चे सर्व शिक्षक धर्मराज हायस्कूल चे सर्व शिक्षक , जिल्हा परिषद मराठी स्कूल चे सर्व शिक्षक वृंद,आंगणवाडी सेविका मदतनीस, ग्राम पंचायत कार्यालय चे कर्मचारी, सदस्य गण,यांची मिटिंग लावून गावातील घरा घराला भेट देऊन लसीकरण करण्यासाठी गावकऱ्यांना कश्याप्रकारे प्रेरित करता येईल यासाठी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने बि.डीओ.प्रणाली खोचरे मॅडम , गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट साहेब हे उपस्थीत होते.

या सभेच्या दुसऱ्या दिवशी लसीकरणाचे आयोजन नवेगाव पांडव येथे करण्यात आले होते. त्यावेळी नागभिड चे तहसीलदार चव्हाण साहेब यांनी नवेगाव पांडव गावातील वाचणालयाबद्दल सरपंचां ऍड.सरपंच शर्मिला रतनकुमार रामटेके मॅडम यांच्याशी चर्चा केली व वाचनालयाला भेट देण्याचा मानस सांगितला.

त्यानुसार सरपंच शर्मिला रामटेके मॅडम हे तहसिलदार चव्हाण साहेब आणि डॉ. विनोद मडावी साहेब यांनी वाचनालयातील विद्यार्थ्याना वाचनालयात भेट दिली . तहसिलदार साहेबांनी अभ्यास कसं काय चाललाय? कोणत्या प्रकाशनाची पुस्तके वाचत अहात? रोज किती तास वाचनालयात बसता? गृप डिस्कशन किती करता? यासंबंधात प्रश्न विचारून विचारपुस केली. विद्यार्थ्याना पाहिजे असलेल्या पुस्तकाची यादी तहसिलदार साहेबांनी मागितली. स्वतः कसा अभ्यास केला ? हेही तहसिलदार साहेबांनी स्पष्ट करत मुलांना अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या व वाचनालयातील विद्यार्थ्यांचे स्वतः स्पर्धा परीक्षा वर्ग घेऊ असे आश्वासन दिले. गटशिक्षणाधिकरी नाट साहेब यांनी तहसीलदार यांना सोबत देऊ असे आश्वस्त केले.

ऍड.रामटेके मॅडम यांनी चव्हाण सहेबांसारखे अधिकारी प्रत्येक तालुक्याला भेटले तर प्रत्येक तालुक्यातून अधिकारी युवा पिढी जन्माला येईल असा आशावाद व्यक्त केला.याप्रसंगी सरपंचां ऍड. शर्मिला रामटेके मॅडम, मेश्राम सिस्टर ,एन बि. डब्लु.बनकर ,पेंटर कुर्वे वडसा, आप्रेटर अलोने ग्राम पंचायत नवेगांव पांडव, विजय नवघडे कर्मचारी ग्राम पंचायत नवेगांव पांडव, आणि इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.लसीकरण करण्यासाठीं सुध्दा गावकऱ्यांनी चांगल्याप्रकारे प्रती साथ दिली त्या निमीत्ताने तहसिलदार साहेबांनी गावातील सरपंच रामटेके मॅडम यांचे व सदस्यांचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED