कोरोना काळातील विशेष कामगिरीबद्दल जयदीप शिंदे यांचा सन्मान

30

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.20नोव्हेंबर):-कोरोनाच्या संकटकाळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खटाव येथील सामाजिक कार्यकर्ते ,उद्योजक जयदीप शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगरविकास मंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे, शिक्षण व सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री मा.ना. बच्चू कडू, राज्यमंत्री अदितीताई तटकरे, ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने ,ठाणे महापौर तसेच मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या शुभ हस्ते कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोना काळात लॉक डाऊन मुळे पाथर्डी येथे हॉस्टेल मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याला कोरेगाव येथे सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून जयदीप यांनी मुलास सुखरूप घरी पोहचवले, माध्यमिक शाळेमध्ये मास्क, सॅनिटायझर, आरसोनिक गोळ्या चे वाटप ,रक्तदान शिबिर,गोर गरीब जनतेला व कोरोंटाईन कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू,किराणा मालाचे वाटप, कोरोना काळात खटाव मधील दगावलेल्या व्यक्तीच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेऊन संपूर्ण शैक्षणिक मदतीचे आश्वासन, कोरोना काळातील रूग्णांना ऑक्सिजन बेड, अंबुलन्स, प्लाझामा, रक्त रेमडीसीवर व इतर मेडिसीन मिळवून देण्यात मोलाचं योगदान, कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करून या दीड वर्षाच्या काळात स्वता 6 वेळा रक्तदान करण्याचं काम जयदीप शिंदे यांनी केलं त्या बरोबरच खटाव गावातील कोरोना पोजीटीव्ह रुग्णांना स्वतःच्या गाडीतून सर्व आरोग्य विषयक काळजी घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याबरोबच ,हॉस्पिटल मधून घरी आलेल्या पेशंट ना कोरोंटाईन होण्यासाठी स्वतःचे राहते घर खुले केले होते, सामाजिक जाणिवेतून केलेल्य कार्याबद्दल शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने जयदीप शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.