26 नोव्हेंबर रोजी चिमूर येथे संविधान सन्मान दिन आयोजित

29

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.20नोव्हेंबर):-संविधान सन्मान दिन समारोह समिती वडाळा (चिमूर)च्या वतीने 72 व्या संविधान सन्मान दिन समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी 11 वाजता चिमूर येथील थोर महापुरुषांच्या स्मृती स्थळांना अभिवादन व बाईक मिरवणुनिकीने होईल.दुपारी 12 वाजता वक्त्यांचे मार्गदर्शन व गुणवंतांचा सत्कार समारंभ विजय भैसारे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे, यावेळी साहित्यिक तथा लेखिका डॉ. संध्या पवार या “महिलांच्या प्रगतीत भारताच्या संविधानात योगदान” या विषयावर मार्गदर्शन करतील.

“भारताच्या संविधान निर्मिती प्रक्रियेत डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे योगदान” या विषयावर प्राचार्य श्याम रामटेके या विषयावर संबोधित करणार आहेत. भारतीय संविधानाचे अभ्यासक ऍड. भीमराव रामटेके हे “भारतीय संविधान आणि त्यापुढील आव्हाने” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करतील.

या वैचारीक कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, ठाणेदार मनोज गभने, नगर परिषद चिमूरचे मुख्याधिकारी गजानन भोयर, तहसीलदार तुळशीदास कोवे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.कोविड-19 च्या नियमाचे पालन करून या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संविधान सन्मान दिन समारोह समिती वडाळा (चिमूर)च्या वतीने करण्यात आले आहे.