वंचित च्या प्रदेशध्यक्षा रेखा ठाकूर उद्या नाशिक दौऱ्यावर

28

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.20नोव्हेंबर):-वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेशध्यक्षा रेखा ठाकूर व राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी दिनांक 21/11/2021 रोजी वंचित बहुजन आघाडी प्रमुख हे नाशिक दौऱ्यावर येत असल्याने नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा वतीने स्वागताची जय्यत तयारी सुरू असून आगामी महानगरपालिका, नगरपालिका , जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा विषय ठरणार आहे.

महापालिकेचा सर्वच जागा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकांच्या निवडणुकीत वंचित बहुजनआघाडी मातंबर उमेदवार उभे करणार असले तरी स्थानिक पातळीवर निवडणुकीत युती कुणाशी करायची याचे सर्वधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहे.रेखाताई ठाकूर यांचा हा दौरा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्यांना उत्सुकता निर्माण करणारा असून या दौऱ्यात कोणती रणनीती आखली जाईल याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.

विशेषतः नाशिक महानरपालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुकांनी पक्षाशी संपर्क साधला असून यावेळी रेखाताई ठाकूर ह्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत कार्यकर्त्याची मते जाणून घेणार आहे हा दौरा यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवनभाऊ पवार, वामन गायकवाड, अविनाश शिंदे, संजय साबळे, संदिप काकळीज बाळासाहेब शिंदे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड आदी पदाधिकारी दौरा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशिल आहे