जिवतीच्या विकासासाठी आम्ही कट्टीबद्द – गजानन पाटील जुमनाके

25

🔹गोंडवाना गणतंत्र पार्टीने फुंकले जिवती नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग

✒️सय्यद शब्बीर जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि 20नोव्हेंबर):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक तयारीसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी तालुका जिवतीच्या वतीने आज गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांच्या जिवती येथील निवास्थानी ही बैठक घेण्यात आली.

जिवती नगरपंचायत वर ज्यांची सत्ता आहे त्यांनी जिवती चा कायापालट करण्या ऐवजी स्वतःचा कायापालाट केला आहे, सत्तेत असतानाही जिवतीचा विकास करू शकले नाही, अश्या जनतेविरोधी असलेल्या लोकांविरोधी ही निवडणूक गोंडवाना गणतंत्र पार्टीने लढवायची आहे, जिवती शहराच्या विकासासाठी आम्ही कट्टीबद्द असल्याच मत गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी व्यक्त केले.

यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा विधानसभा कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंगजी जाधव, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर,निशिकांत सोनकांबळे, भीमराव पाटील जुमनाके, युवा नेते जमालुदिन शेख, गोपाळ देशमुख,इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.