सप्तशृंगी गडावर  अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

30

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.20नोव्हेंबर):-सप्तशृंगीगड परिसरातील परशुराम बाला मंदिर जवळील उंबरझोती या  जंगलात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळुन आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.

 मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस  घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे.

कळवण  पोलीस ठाणे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. कळवण  पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आढळलेल्या हा मृतदेह पुरुषाचा असून अंगावर सफेद शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेली दिसत आहे. वय अंदाजे १८ ते १९  असून सदरची बॉडी कळवण उपजिल्हा रुग्णालय  या ठिकाणी नेण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून  घडत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत. अशातच अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने हा व्यक्ती नक्की कोण आहे, त्याचा मृतदेह जंगलात  कसा गेला, त्याचा खून झाला की आत्महत्या, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे
पोलीस तपासानंतर याप्रकरणी नक्की काय खुलासा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह तपासणी करून शोशल मीडिया माध्यमातुन मृताचे छायाचित्र पाठवण्यात आले सदर शोशल मीडियाचा माध्यमातून मृतांची ओळख पटली आणि पोलीस तपासाला चालना मिळाली सविस्तर वृत्त असे की प्रविण रावसाहेब गवळी वय १८ (मु.पो.वरवंडी, ता.देवळा ,जि. नाशिक) हा व्यक्ती तीन ते चार  दिवसांपासून घरातून बेपत्ता होता.आणि त्याचा मृतदेह सप्तशृंगी गडावर जंगल भागात हात  बांधून एका कपड्याचा साह्याने गळा अवळल्याने मिळाला छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे .या तपासासाठी गुन्हे शाखा पथक ,पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड,पोलीस निरीक्षक समाधान नागरे ,पोलीस कर्मचारी उपस्थित होते