आगामी मुंबई महापालिका भाजप आरपीआय एकत्र युती करून लढणार

🔹केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

✒️प्रतिनिधी विशेष(समाधान गायकवाड)

मुंबई(दि.20नोव्हेंबर):- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी भाजप चे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी मुंबईत भेट घेऊन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा केली.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत युती करून लढणार असल्याचे यावेळी चर्चा झाली असुन दोन्ही पक्षाचे युतीबाबत एकमत झाल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी दिली.यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळात ना रामदास आठवले यांच्या समवेत अविनाश महातेकर; कृष्णमिलन शुक्ला; गौतम सोनवणे; एम एस नंदा आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED