एस.टी शासनात विलीनीकरण करा- दादासाहेब शेळके(राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 21नोव्हेंबर):-शहरात सुरू असलेल्या एस.टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला दादासाहेब शेळके यांची भेट.

मागील अनेक दिवसांपासून उमरखेड शहरमध्ये एस टी शासणात विलीनीकरण करा..! या मुख्य मागणीला धरून एस.टी कर्मचारी यांचा सुरु असलेल्या संपाला मा. दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना) यांनी प्रत्यक्ष भेट देऊन एस. टी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि यावर दादासाहेब शेळके हे बोलत असतांना ते म्हणाले एस.टी कर्मचारी यांची मागणी योग्य अजुन बाकी महामंडळांना सरकारने शासनात विलीन केले.

मग एस.टि. कर्मचारी यांने सरकारचे काय घोडे मारले का.?
अत्यंत तुटपुज्या पगारात हा कर्मचारी आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत आहे.

कौटुबीक गरजा त्यांच्या कमी पगारामुळे पुर्ण होत नाहीत. त्यामुळे सरकारने एस.टि. कर्मचारी यांच्या संपाची तातडीने दखल घावी अन्यथा भिम टायगर सेना या वर तिव्र आदोलंन छेडेल.

असा इशारा सरकारला दिला.व संपकरी एस.टी. कर्मचारी यांना भिम टायगर संघटनेच्या वतीने जाहीर पाठीबा दिला.यावेळी उमरखेड भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर, कैलास कदम (तालुकाध्यक्ष), शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष), संतोष जोगदंडे (तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), देवानंद पाईकराव (जिल्हा कार्याध्यक्ष रिपब्लिकन सेना यवतमाळ) व आगारातील अनेक कर्मचारी हे उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED