भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या संविधान जनजागृती सन्मान रथयात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन

25

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.21नोव्हेंबर):-संविधानरक्षक मा.ऍड.चंद्रशेखर आजाद नेतृत्वाखालील यांच्या भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने येत्या रविवारपासुन राज्यभरात संविधान जनजागृती सन्मान रथयात्रा सुरू होत आहे.

पुणे येथून सुरुवात होणाऱ्या या रथयात्रेचा समारोह दि.६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी या ठिकाणी होणार आहे.दि.२७ नोव्हेंबर २०२१ ला संविधान जनजागृती सन्मान रथयात्रा पुसद येथे येणार आहे .

या सन्मान यात्रेला मा.अशोकजी कांबळे राष्ट्रीय महासचिव महाराष्ट्र प्रभारी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष ,मा.दत्तूजी मेंढे भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ,मा.सितारामजी गंगावणे महाराष्ट्र मुख्य संघटक, मा.दिपकजी भालेराव,कोर कमिटी सदस्य ,मा.राजुजी झनके, महाराष्ट्र कार्याध्यक्ष, मा.सुनील गायकवाड राज्य महासचिव ,मा.प्रशांत बनसोड राज्य उपाध्यक्ष, मा.बलराज दाभाडे राज्य महासचिव, मा.रमेश बालेस राज्य महासचिव ,मा.उत्तम साबळे इत्यादी राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .

तरी ही आपण सर्वांनी या संविधान सन्मान रथयात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ भालेराव यांनी केले आहे.