नेरी पोलीस चौकी अंतर्गत देशी दारुसह दोन आरोपी अटकेत

28

🔺81 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.21नोव्हेंबर):-पोलीस स्टेशन, चिमूर अंतर्गत येत असलेल्या नेरी पोलीस चौकीचे प्रभारी ए. पी.आय. मंगेश मोहोड यांचे नेतृत्वाखाली अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धाड टाकण्यात आली असता दोन आरोपींना अटक करून देशी दारू व दुचाकी वाहन जप्त करण्यात आले.

दि.21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.00 दरम्यान पो. स्टे. चिमूर अंतर्गत पोलिस चौकी नेरी हद्दीत एपीआय मंगेश मोहोड यांचे पथकाने दारू रेड केली असता, गोंडेदा ते वडसी रोडवर आरोपी मुकेश गजानन सोनुले (वय 25 वर्ष) रा.गोंडेदा, मोहित सुधीर कोटरंगे (वय 21 वर्ष )रा. केवाडा हे नवीन होंडा शाइन (नंबर नसलेली) या मोटरसायकलने 26 देशी दारु पावट्या प्रत्येकी 90 मिली वाहतूक करताना मिळून आले.

आरोपींचे ताब्यातून नवीन होंडा शाइन (नंबर नसलेली) मोटरसायकल (किंमत अंदाजे रू.80 हजार), 26 देशी दारु पावट्या (प्रत्येकी 90 मिली) किंमत अंदाजे रू.1,300/- असा एकूण रू.81,300/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन पोलिस स्टेशनला आरोपींविरुद्ध कलम 65 (अ), 83 म.दा.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कार्यवाही पो.नि.श्री. मनोज गभने यांचे मार्गदर्शनामध्ये एपीआय मंगेश मोहोड, कर्मचारी प्रमोद पढाळ, प्रमोद गुट्टे यांनी केली.