गुटखा प्रकरण भोवले ! कुंडलिक खांडेंना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून काढले

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.22नोव्हेंबर):- शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी गुटखा साठा प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले. त्यांनतर फरार असतानाही शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या स्वागताला ते हजर होते. यावरून चांगलेच वादंग पेटले होते. हेच सर्व खांडे यांच्या अंगलट आले.

आज सामना दैनिकातून खांडे यांच्या पदाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले आहे. लवकरच नव्या जिल्हाप्रमुखचे नाव जाहीर केले जाईल असेही त्यात म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल
©️ALL RIGHT RESERVED