चंद्रपूर शहरातील विविध रस्त्याच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(ता.22नोव्हेंबर):-चंद्रपूर शहरातील विविध भागातील रस्ते दुरुस्तीसाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सभापती संदीप आवारी यांनी यावेळी सांगितले.चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत सोमवारी (ता. २२) स्थायी समिती सभागृहात सभा पार पडली. सभेच्या प्रारंभी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहरातील विविध रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

यात प्रामुख्याने नागरी दलित वस्ती सुधार योजना निधीतून अंचलेश्वर ते बागला चौकपर्यंत रस्ता विकसित करण्यासाठी १ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. यासह महाराष्ट्र नगरोत्थान निधी (सन २०२०-२१) अंतर्गत भानापेठ प्रभाग क्र. ११ मध्ये श्री. रायकट्टा ते श्री. झिलपे यांच्या घरापर्यंत, मंदिर ते श्री. पोपटलाल बजाज ते शास्त्रीनगर ते श्री. कोयाद्वारे व श्री. बेजंगवार ते नापल्लीवार यांच्या घरापर्यंत रस्ता व नालीचे बांधकाम, महाराष्ट्र नगरोत्थान निधी (सन २०२०-२१) अंतर्गत भानापेठ प्रभाग क्र. ११ मध्ये श्री.धरणे यांचे घरापासून श्री. चिमुरकर यांचे घरापर्यंत आणि मोहता प्लॉट परिसरात काँक्रीट रस्ता नालीचे बांधकाम, वडगाव प्रभाग क्र. ०८ मध्ये मेन रोड ते श्री. येरगुडे ते श्री, भांदककर ते श्री. शास्त्रकार ते श्री. ढवस ते वाढई ते श्री. नांदेकर पर्यंत काँक्रीट रास्ता व नाली बांधकामाकरिता निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील महत्वपूर्ण रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED