बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सिकलसेल आजाराची बाभुळगाव येथे जनजागृती अभियान.

29

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.22नोव्हेंबर):-येवला तालुक्यातील बाभुळगाव येथे असलेल्या आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृह येथे पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने सिकलसेल आजाराची जनजागृती करण्यात आली.सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोदा आरोग्य अधिकारी डॉ. भारत कुलथे, वसतिगृहाच्या सुशीला पेढेकर, डॉ. अमोल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी डॉक्टर कुलथे यांनी विविध आजारा संदर्भात माहिती देत सिकलसेल आजार हा अनुवंशिक असल्याने दुर्गम भागातील आदिवासी जमाती मध्ये विवाह आपल्या नाते संबंधात मोठ्या प्रमाणात घडवून आणतात म्हणून आदिवासी सुशिक्षित मुलींना या सिकलसेल आजाराची माहिती व जनजागृती करणे गरजेचे असल्याने येथील आदिवासी विकास संशोधन प्रकल्प शासकीय वस्तीगृह बाभूळगाव येवला येथील आदिवासी मुलींसाठी हा सिकल सेल आजार संदर्भात जनजागृती करण्यात आली.

वंशाने चालत आलेल्या विविध आजारांचा प्रसार होत असताना याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येतात म्हणून सिकलसेल आजाराची माहिती असणे ही काळाची गरज असल्याने या शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थिनी सह वस्तीगृह कर्मचारी डी एस ससाने यांचीही सिकल्सेल चाचणी घेण्यात आली.

यावेळी पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. भारत कुलथे, धुळगाव उपकेंद्राचे आरोग्यसेव रमेश ताठे, आरोग्य सेविका एस ए शेख, पर्यवेक्षिका एम एम पगारे आशा स्वयंसेविका सविता आहेर ,सुनिता राजगुरू ,संगीता राजगुरू, आशा गटप्रवर्तक निशिगंधा पगारे, सुशीला पेढेकर, डॉ.अमोल गायकवाड, रामेश्वर देव्हारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचा वस्तीगृहाच्या गृहपाल सुशीला पेढेकर यांनी सत्कार करून रामेश्वर म्हणून देव्हारे यांनी सूत्रसंचालन केले तर डी एम ससाने यांनी आभार मानले