समाजोपयोगी उपक्रम राबवून भा.ज.पा. युवा अध्यक्ष पंकजभाऊ खरवडे यांचा वाढदिवस साजरा..

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.22नोव्हेंबर):-कोणताही राजकीय वारसा नसला तरी समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असेल तर त्यासाठी नक्कीच मार्ग सापडतो. याचा प्रत्यय आरमोरी येथील युवा व्यक्तिमत्व असलेले पंकज भाऊ खरवडे यांच्या कार्यामुळे प्रत्ययास येतो. समाजातील अनुभवी , कार्यकुशल असलेल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आणि सामाजिक कार्यात बराच पल्ला गाठून सर्वसामान्यांचे अनेकविध प्रश्न सोडविण्यात आपल्याला धन्यता, समाधान आहे आणि तेच आपले ध्येय असल्याचे ते मानतात. आणि आपल्या व्यक्तिमत्वाची कृती करित पंकज भाऊ यांनी आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन प्र. क्र. 2 येथे होणाऱ्या वाचनालयासाठी येणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था स्वखर्चाने करण्याचा निर्धार केला आहे..

अश्या विविध गुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या पंकज भाऊ खरवडे यांचा जन्मदिवस त्यांच्या कार्यकर्ता आणि मित्रमंडळींच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथील रुग्णांना फळ वाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.यावेळी आरमोरी न.प. चे प्रथम नगराध्यक्ष पवन भाऊ नारनवरे, न. प. सभापती भारत भाऊ बावनथडे, अमोल खेडकर, जितुभाऊ ठाकरे, टिंकु बोडे, रुपेश पुणेकर,अमित राठोड, आणि आरमोरी येथील बहुसंख्य मित्रपरिवार उपस्थित होते.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED