इस्लामपुरात महाविद्यालयीन तरूणावर अनैसर्गिक अत्याचार:रक्षक झाला भक्षक

66

🔸विकृत पोलीस हणमंत कृष्णा देवकर याला अटक

✒️इस्लामपूर प्रतिनिधी(इकबाल पीरज़ादे)

इस्लामपूर(दि.22नोव्हेंबर):-महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (वय ३४) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने २७ नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ माजली आहे.याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.इस्लामपूर पोलीस ठाणेस नेमुणकीस असलेला पोलीस कर्मचारी देवकर व त्याच्या बरोबर असलेले पोलीस कर्मचारी २७ ऑक्टोबरला पहाटे ०३.०० वाजता पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा पिडीत मुलगा हा त्याच्या मैत्रिणीला भेटून पुन्हा त्याचे वस्तीगृहात जात होता. तेव्हा पोलिसांनी त्यास अडवून “ आत्ता कोठून आलास इथे काय करतो ” असे विचारले असता मैत्रिणीला भेटून आलो आहे असे त्या युवकाने सांगितले.

त्यावेळी आरोपी हणमंत देवकर याने पिडीत मुलाची चौकशी करून त्याचा मोबाईल नंबर घेतला. २९ ऑक्टोबर रोजी पोलीस हणमंत देवकर याने मोबाईलवरून फोन करून “ कॉलेजच्या गेटवर भेटायला ये ” असे सांगितले. भेटायला गेलेवर त्यास त्याचे मैत्रिणीचे प्रेमप्रकरणावरून धमकावून पैशाची मागणी केली. तुच्या घरी व मैत्रिणीचे घरी तुमच्या प्रकरणाबाबतची माहिती देणार असल्याचे धमकावले.त्यावेळी त्याने घाबरून त्याचे कॉलेजमधील मित्रांचेकडून ४००० रुपये उसने घेवून पोलीस हणमंत देवकर यास दिले. परंतु त्याचे समाधान झाले नाही. आरोपी हणमंत देवकर याने पिडीतास “ तुझ्या मैत्रिणीचा नंबर मला दे , व तिला माझ्यासोबत सेक्स करायला सांग ” असे सांगितले . त्यावेळी पिडीताने ती मुलगी चांगली आहे व तसे करण्यास स्पष्ट नकार दिला . त्यावेळी आरोपी हणमत देवकर याने पिडीतास “ तु मला तुझ्या मैत्रिणीसोबत जर सेक्स करायला देत नसशील तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार ” असे म्हणाला . त्यावर पिडीत मुलगा घाबरला . आरोपी हणमंत देवकर याने पिडीतास तुझ्या रूमवर चल , मला तुझ्यासोबत सेक्स करायाचा आहे ” असे सांगितलेनंतर त्याने पिडीताने आपल्या मित्रास दुसऱ्या रूममध्ये जाणेस सांगितले आरोपी हणमंत देवकर व पिडीत मुलगा असे पिडीत मुलाचे रूममध्ये गेले . तेथे आरोपी हणमंत देवकर याने पिडीत याचेबरोबर अनैसर्गिक संभोग केला व त्यांचेत झालेला अनैसर्गिक संभोगाचा व्हिडीओ आरोपी हणमंत देवकर याने केला व तेथून निघून गेला.

२१ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वा . चे सुमारास आरोपी हणमंत देवकर याने पुन्हा पिडीत मुलास त्याचे मोबाईलवरती फोन करून कॉलेजच्या गेटवर बोलावून संभोगाची मागणी केली . व त्याचे मोबाईलमधील त्यांचेतील अनैसर्गिक संभोगाचा व्हिडीओ दाखविला व “ तु आज माझ्यासोबत आला नाहीस तर तुला आता दाखविलेला व्हिडीओ मी व्हायरल करीन ” अशी धमकी दिली व निघून गेला . सदर घडलेप्रकाराबाबत पिडीताने त्याचे मित्रास सांगून त्यानंतर पोलीस ठाणेत येवून इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण करीत आहेत .