पैगंबर मोहम्मद बिल व 5%मुस्लिम शैक्षणिक आरक्षण लागू करण्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलनात्मक निवेदन

✒️प्रतिनिधी नेरी(नितीन पाटील)

नेरी(दि.22नोव्हेंबर):-मागील अनेक वर्षांपासून मोहम्मद पैगंबर बिल आणि 5%मुस्लिम शैक्षणिक आरक्षण लागू करण्या संदर्भातल्या मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत मात्र कोणतीही कार्यवाही शासनस्तरावर केल्या गेली नाही त्यामुळे शिक्षण, नौकरी याविषयी संबंधित घटकामध्ये नाराजी व्यक्त होत आहे, एवढेच नाही तर महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकती मध्ये वाढ करून इमाम व मुअज्जीन आणि खुद्दम हजरत यांना मासिक वेतन मिळत नाही ते सुरु करण्यात यावे,वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करण्यात यावा तसेच संत विचाराचा प्रचार प्रसार करणाऱ्या ह.भ.प.किर्तनकार याना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.

धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्याना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल या आधीच वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे,ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तो कायदा तात्काळ लागू करावा.सारथी,बार्टी, महाज्योति प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी आदि मागण्याचा समावेश असलेले निवेदन मा.उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फतीने मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिले आहे.

हे निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी चे स्नेहदिप खोब्रागडे(जिल्हा सदस्य चंद्रपूर),नितेश श्रीरामे(तालुका अध्यक्ष चिमूर),शालिक थुल(शहर अध्यक्ष चिमूर),ज्ञानेश्वर नागदेवते(तालुका उपाध्यक्ष चिमूर),वामन डांगे (तालुका संघटक चिमूर),मनोज राऊत(शहर उपाध्यक्ष चिमूर),भाग्यवान नंदेश्वर, आकाश भगत,रविंद्र धारने, विकास घोनमोडे,कुंदन टेंभूरने आदी उपस्थित होते.
वरीलप्रमाणे मागण्या हिवाळी अधिवेशनात मंजूर न झाल्यास वंचित बहुजन आघाडी कोणते पाऊल उचलेल हे आताच सांगता येत नाही.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED