लग्नानंतर सत्यनारायण पूजा होताच नवरदेवाची आत्महत्या

27

🔹बीड जिल्ह्यातील घटनेने खळबळ

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

माजलगाव(दि.22नोव्हेंबर):- तालुक्यातील नित्रुड येथील तरुण शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना घडली. पांडुरंग रामकिसन डाके (वय २६) असे त्याचे नाव असून शनिवार (दि.२०) रोजी माजलगाव येथे त्याचा विविह सोहळा पार पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी सत्यनारायण पूजा पार पडली. सर्व कुटुंबिय आणि नववधू घरातील कामात व्यस्त होते.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पांडुरंग शेतात गेला आणि त्याने एका झाडाला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. त्याने आत्महत्या का केली? याचे अद्याप कारण समजू शकले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.