अंगावर पुष्पवृष्टी करून झालेल्या स्वागताने खेळाडू भारावले

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24नोव्हेंबर):-ड्रेगणबोट रेस राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या महाराष्ट्राच्या टीममधील खेळाडू गंगाखेडात येताच त्यांच्यावर स्वागतासाठी पुष्पवृष्टी करण्यात आली. खेळाडूंना भारावून टाकणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सत्कार सोहळ्याचे आयोजन सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केले होते.हिमाचल प्रदेशात नववी ड्रॅगन बोट रेस राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. यात महाराष्ट्राच्या संघाने दुसरा क्रमांक मिळवला.

महाराष्ट्राच्या या विजेत्या संघात परभणी जिल्ह्याची बहुतांश खेळाडूंचा सहभाग होता. खेळाडू गंगाखेड येथे येत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी गंगाखेड येथील रघुवीर जिनिंग परिसरात या खेळाडूचा अंगावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमानुल्ला खान , मरडसगाव पंचायत समितीचे नेते जयदेव मिसे, ग्राहक पंचायतचे तालुका सचिव मुंजाभाऊ लांडे आदींनी या खेळाडूवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी खेळाडू उपस्थित होते. आपल्या भूमीतील खेळाडूंचा सत्कार केल्याबद्दल विनायक महाराज मुलगीर यांनी सत्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

खेलकुद , महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED