ज्ञानेश्वरजी साबळे यांना राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते शौर्यचक्र देऊन सन्मानित केल्याबद्दल आमदार श्र्वेताताई महाले यांनी केला सत्कार

52

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.24नोव्हेंबर):-बुलढाना जिल्हामधील चिखली तालुक्यातील उंन्द्री येथील रहिवासी जवान केंद्रीय राखीव पोलिस बल ‘सीआरपीएफच्या सर्वोच्च परंपरांचे पालन करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनुकरणीय शौर्य, धैर्य आणि कर्तव्याप्रति कमालीची बांधिलकी दाखवल्याबद्दल उंन्द्री (उदयनगर) गावचे सुपुत्र जवान ज्ञानेश्वरजी_साबळे यांना राष्ट्रपती रामनाथजी_कोविंद यांच्या हस्तेशौर्यचक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.आज उंद्री (उदयनगर)येथे आगमनप्रसंगी जवान ज्ञानेश्वरजी साबळे यांचा सत्कार केला.

या वेळी पंचायत समिती सभापती सौ. सिंधुताई तायडे, श्री. जितेंद्र कलंत्री पंचायत समिती सदस्य, श्री. संजय महाले जिल्हा सचिव भाजप, श्री. पंजाबराव धनवे पाटील युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, श्री. दिगंबर राउत अध्यक्ष सहकारी सोसायटी, श्री. भीमराव अंभोरे, श्री. राजकुमार राठी तालुका उपाध्यक्ष, श्री. गणेश यंगड तालुका उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती, श्री. गजू काळे, श्री. महादेव ठाकरे, श्री. गजानन दुधाळे, श्री. अशोक हातागळे व गांवकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते