फलटण येथील शंभूराज डेव्हलपर्सच्या तीन भागीदारावर फौजदारी गुन्हा दाखल

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.२४नोव्हेंबर):- भारतीय युवा पँथर संघटनचे जिल्हाध्यक्ष विराज केशव भोसले यांच्या मागणीला यश आले असून मंडल अधिकारी यांनी स्वतः पोलीस स्टेशनला उपस्थित राहून फिर्याद दिली त्याबाबत सविस्तर हकीकत अशी की विलास भागोजी जोशी वय 56वर्षे धंदा नोकरी (मंडल अधिकारी फलटण भाग समक्ष फलटण शहर पोलीस ठाणेत हजर राहुन देतो खबरी जबाब दिला की मी वरील ठिकाणचा रहाणारा असुन मी गेले चार वर्षापासुन तहसिल कार्यालय फलटण येथे मंडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतो. दि. 11/11/2021 रोजी मा. उपविभागीय अधिकारी फलटण उपविभाग फलटण दिला की शंभुराज डेव्हलपर्स तर्फे भागीदार..

1) नितीन धनाजी बोबडे 2) निलीमा सचिन बोबडे 3) किरण लालासो चव्हाण यांना मौजे जाधववाडी फलटण येथील सर्व नं 53/2प्लॉट नं उमध्ये अपार्टमेंटचे बांधकाम करणेकामी आमचे कार्यालयाकडील आदेश क्रमांक/ जमीनाबा.प. एस. आर/76/2014दि. 25/08/2014 अन्वये परवानगी देणेत आलेली होती. परंतु त्यांनी दिले परवानगीप्रमाणे त्यांनी बांधकाम न करता त्यामध्ये बदल केले बाबत विराज केशव भासले रा जाधववाडी ता फलटण यांनी दि.7/10/2020 रोजी तकारी अर्ज दिला होता. सदर तक्रारी अर्जाचे अनुशंगाने मा. उपविभागीय अधिकारी यांनी सहाय्यक संचालक नगररचना यांना सदर कामकाजाची पाहणी करुन रिपोर्ट सादर करणेबाबत कळविले होते त्यानंतर सहाय्यक संचालक नगररचना विभाग यांनी सदर बांधकामाची पाहणी करून त्यांनी लेखी पत्राद्वारे कळविले की सदर बांधकामामध्ये..

1) प्रस्तुत जागेमध्ये मंजुर आराखजयानुसार बांधकाम केलेले नाही 2) प्रस्तुत जागेच्या आराखडयातील खुली जागा व रस्ते याची नोंदणी ग्रामपंचायत मध्ये केलेधी दिसुन येत नाही 3) सदर जागेमध्ये किमान 8झाडे लावुन त्याची जोपासणा करणे आवश्यक असताना देखील वृक्ष लागवड केली नसल्याचे दिसून येत आहे. तसेच सदर जागेतील बांधकामाची पाहणी केली असता बांधकाम नकाशाप्रमाणे झाले नसल्याचे दिसुन येत आहे. मंजुर बांधकाम नकाशावर दर्शविल्याप्रमाणे झाले नसल्याचे दिसुन येते तसेच प्रस्तुत अटी व शर्तीनुसार सदर इमारतीमध्ये सौरऊजी प्रणाली बसविली नसलेचे असे दिसून आले नसल्याने त्यांनी सहाय्यक संचालक नगररचना याचे आदेशाचा भंग करून त्यांनी प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52प्रमाणे गुन्हा केला आहे. म्हणुन माझी 1) नितीन धनाजी बोबडे रा. घाडगेवाडी ता फलटण जि. सातारा 2) निलीमा सचिन बोबडे रा घाडगेवाडी ता फलटण जि. सातारा 3) किरण लालासो चव्हाण रा. स्वामी विवेकानंदनगर फलटण याचे विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद आहे. समोर माझा संगणकावर टंकलिखित केलेला खबरी जबाब मी वाचून पाहिला ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे.

हा जबाब दिला. (आर.बी. सोनवलकर पोहवा 1407) फलटण शहर
सदर विकसनकर्ता यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली परंतु शासनाचे नियम मोडून बांधकाम करून लोकांना त्या इमारतीमधील सदनिका विकून त्याची एक प्रकारे आर्थिक फसवणूक होत आहे? इतर ठिकाणी चालू असलेले बांधकामाची पाहणी होणार का?सामान्य लोक 20 वर्ष परतफेडीच्या मुदतीवर कर्ज काढून सदनिका/फ्लॅट विकत घेतात .परंतु फक्त बांधकाम बघितले जाते इतर कागदपत्र लोक मागत नाहीत.त्यामुळे आपण घेत असलेल्या इमारती मधील सदनिकेचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे आहे किंवा नाही हे त्यांना समजत नाही.

विराज भोसले येत्या काळात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहेत.ग्राहक मंच कडे तक्रार दाखल करणार आहेत.तसेच इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करणयाची मागणी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED