केदारगुडा येथील पोलिस पाटील यांचे पद भरण्यात यावे – ग्रामस्थांकडून मागणी

✒️सिद्धार्थ वाठोरे(नांदेड प्रतिनिधी)मो:-93738 68284

नांदेड(दि.24नोव्हेंबर):- – हादगाव तालुक्यातील मौजे केदारगुडा येथील गावकऱ्यांच्या वतीने गावातील अनेक दिवसापासून पोलीस पाटील हे पद रिक्त असल्यामुळे ते पद लवकरात लवकर भरण्यात यावे या मागणीचे निवेदन २४नोव्होंबर रोजी केदरगुडा येथिल सरपंच तानाजी गायकवाड, उपसभापती मनोहर माहुरे, मारोती पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी मा. तहसीलदार तहसील कार्यालय हदगांव यांना देण्यात आले.

मौजे केदारगुडा ता. हदगाव जिल्हा नांदेड येथील रहिवाशी असुन मोजे केदारगुडा ता. हदगाव येथील पोलिस पाटील सेवा निवृत्त झाल्यामुळे मागील १ वर्षा पासुन मौजे केदारगुडा येथील पोलिस पाटील पद हे रीक्त आहे त्यामुळे केदरगुडा गावातील नागरिकांना व विद्यार्थीना वेगवेगळ्या शासकीय व निमशासकीय रहिवासी, उत्पन्न, मतदान आशा अनेक प्रमाणपत्रासाठी अडचण येत आहे. येथील नागरिकांची व विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे.त्यामुळे गावातील नव्याने पोलिस पाटील पद त्वरीत भरण्याकरीता जाहिरात काढण्यात यावी.

मौजे केदारगुडा ता. हदगाव येथील पोलिसपाटील पद नव्याने लवकरात लवकर भरावे व नागरिकांचे व विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी असी निवेदनाद्वारे केदरगुडा येथिल ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली.यावेळी केदारगुडा येथील सरपंच तानाजी गायकवाड माजी उपसभापती मनोहर माहुरे मारुती पवार तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथील सर्वच सदस्य यांच्या या निवेदनावर सह्या आहेत

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED