राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि .२४नोव्हेंबर):- विविध ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान तर ; २२ डिसेंबर २०२१ मतमोजणी होईल . त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे , अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू . पी . एस . मदान यांनी आज येथे केली . श्री . मदान यांनी सांगितले की , राज्यातील एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या ८१ आणि डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १८ ; तसेच नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल .

त्यासाठी १ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील . ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत . नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबर २०२१ रोजी होईल . निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १३ डिसेंबर २०२१ असेल . अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत अपिलाचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत किंवा १६ डिसेंबर २०२१ पर्यंत असेल . मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल . २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल . राखीव जागेवर निवडणूक लढविणान्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील . त्याचबरोबर कोविड १ ९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा . त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी , असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अशी माहितीही श्री . मदान यांनी दिली . सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे : ठाणे मुरबाड व शहापूर , पालघर तलासरी , विक्रमगड , मोखाडा , रायगड- खालापूर , तळा , माणगाव , म्हसळा , पोलादपूर , पाली ( नवनिर्मित ) , रत्नागिरी- मंडणगड , दापोली , सिंधुदुर्ग कसई- दोडामार्ग , वाभवे – वैभववाडी , कुडाळ , पुणे- देहू ( नवनिर्मित ) , सातारा लोणंद , कोरेगाव , पाटण , वडूज , खंडाळा , दहीवडी , सांगली- कडेगाव , खानापूर , कवठे – महाकाळ , सोलापूर- माढा , माळशिरस , महाळूंग – श्रीपूर ( नवनिर्मित ) , वैराग ( नवनिर्मित ) , नातेपुते ( नवनिर्मित ) , नाशिक निफाड , पेठ , देवळा , कळवण , सुरगाणा , धुळे- साक्री , नंदुरबार धडगाव – वडफळ्या रोषणमाळ , अहमदनगर अकोले , कर्जत , पारनेर , शिर्डी , जळगाव बोदवड , औरंगाबाद- सोयगाव , जालना बदनापूर , जाफ्राबाद , मंठा , घनसावंगी , तीर्थपुरी ( नवनिर्मित ) , परभणी- पालम , बीड- केज , शिरूर कासार , वडवणी , पाटोदा , आष्टी , लातूर- जळकोट , चाकूर , देवणी , शिरूर अनंतपाळ , उस्मानाबाद- वाशी , लोहारा बु . , नांदेड नायगाव , अर्धापूर , माहूर , हिंगोली सेनगाव , औंढा नागनाथ , अमरावती- भातकुली , तिवसा , बुलडाणा संग्रामपूर , मोताळा , यवतमाळ- महागाव , कळंब , बाभुळगाव , राळेगाव , मारेगाव , झरी जामणी , वाशीम मानोरा , नागपूर हिंगणा , कुही , वर्धा- कारंजा , आष्टी , सेलू , समुद्रपूर , भंडारा- मोहाडी , लाखनी , लाखांदूर , गोंदिया- सडकअर्जुनी , अर्जुनी , देवरी , सावली , चंद्रपूर पोंभुर्णा , गोंडपिपरी , कोरपना , जिवती , सिंदेवाही – लोनवाही , मुलचेरा , गडचिरोली- एटापल्ली , कोरची , अहेरी , चामोर्शी , सिरोंचा , धानोरा , कुरखेडा आणि भामरागड . पोटनिवडणुकांसाठीही मतदान विविध जिल्ह्यातील सात नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठीदेखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे . शिरोळ ( ६ अ ) नागभीड ( ४ अ ) . जत ( ५ ब ) , सिल्लोड ( १२ अ ) , फुलंब्री ( २ आणि ८ ) . वानाडोंगरी ( ६ अ ) आणि ढाणकी ( १२ आण १३ ) या नगरपरिषद / नगरपंचायतीतील सदस्यपदांच्या रिक्तपदांसाठी या पोटनिवडणुका होत आहे .

महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, राजनीति, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED