ब्रम्हपुरीत भव्य रात्रकालीन टेनिस बॉल हाप पिच क्रिकेट स्पर्धा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24नोव्हेंबर):–जय बजरंग क्रिकेट क्लब ,ब्रम्हपुरी तर्फे पेठवार्ड चषक भव्य रात्रकालीन टेनिस बॉल हाप पिच क्रिकेट स्पर्धा दि 25 नोव्हेंबर 2021 ते अंतिम सामन्यापर्यत रेल्वे फाटक जवळ वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज चौक आरमोरी रोड, पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

पेठवार्ड चषक भव्य रात्रकालीन टेनिस बॉल हाप पिच क्रिकेट स्पर्धे करीता प्रथम पारितोषिक 71000/- (एकात्तर हजार रुपये),स्व. चंद्रभान सखाराम भर्रे यांच्या स्मूती प्रित्यर्थ नगरसेवक महेशभाऊ भर्रे यांच्या कडून व दितीय पारितोषिक 51000/-(एकावन हजार रुपये)मा. प्रवीण(सोनू)भानुदासजी गेडाम राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग ब्रम्हपुरी यांच्या कडुन तर तृतीय पारितोषिक 31000/-(एकतीस हजार रुपये) मा. प्रमोदभाऊ चिमुरकर जिल्हा परिषद सदस्य, रवीभाऊ नाकतोडे, मा. जितूभाऊ शेंडे यांच्या कडून देण्यात येणार आहे.

विशेष बक्षीस मॅन ऑफ द सिरीज 5001/- श्री. गजानन इलेक्ट्रॉनिकलस ,बेस्ट बेस्टमन 5001/-सारंगभाऊ बनपूरकर ,बेस्ट बॉलर 5001/-सचिदानंद ट्रेडर्स, बेस्ट फिल्डर 3001/- गृहशोभा फर्निचर मार्ट ब्रम्हपुरी, बेस्ट विकेट किपर 3001/-शिवशाही ढाबा, बेस्ट कॉच 3001/- खेमराज तिडके अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी, यांच्या कडून देण्यात येणार आहे. तरी टेनिस बॉल हाप पिच क्रिकेट स्पर्धे करिता क्रिकेट टीमनी जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन जय बजरंग क्रिकेट क्लब ब्रम्हपुरीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

खेलकुद , महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED