उपसरपंच सोबत युवकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

🔹चिमूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कोलारी येथिल उपसरपंच नुतन प्रधान यांच्या सोबत ग्रा. पं. सदस्य व गावातील अनेक युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.25नोव्हेंबर):-राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विकासकामावर विश्वास ठेवून काॅंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश संघटक धनराज मुंगले, व चिमुर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष काशीनाथ खरकाटे, यांच्या नेतृत्ताव चिमूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कोलारी येथिल उपसरपंच नुतन प्रधान यांच्या सोबत ग्रापं सदस्य व गावातील अनेक युवकांनी काॅग्रे‌स पक्षात जाहीर प्रवेश केला.

ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काॅंग्रेस कार्यकर्ता मेळावा ब्रह्मपुरी तालुक्यातील रुई येथील प्रभात पाॅलिटेक्निक महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री यांचे हस्ते पक्षाचा दुपट्टा व पूष्पगुच्छ देवून प्रवेश करण्यात आला.यावेळी पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार,धनराज मुंगले व काशिनाथ खरकाटे यांनी उपसरपंच,सदस्य व युवकांचे स्वागत करुण समोरील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपसरपंच नुतन प्रधान,ग्रामपंचायत सदस्य लता हुमने,सुषमा आंबोंने,तुळशिदास नागमोती,अरुन प्रधान,रोहीत आंबोने,नवनाथ चंडीकार,मुखरण मेश्राम,संजय बावने,पंढरी हुमने,गजानन भुरले,निलेश बावने,दिवाकर नाकाडे,संजय कांबळे,सुहास हुमने,आदींनी प्रवेश केला.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर,देविदास जगनाडे बेलगाव चे सरपंच सुधिर पिलारे,माजी सरपंच विनोद बुल्ले,माजी उपसरपंच गुलाब वाघधरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED