स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन केले अभिवादन

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.25नोव्हेंबर):-महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 37 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्रासाठी असलेले योगदान मोलाचे असून त्यांच्या विचारांवर महाराष्ट्र शासनाचे काम सुरु असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED