अवैध वाळू वाहतूक करणार्‍या हायवासह दोन ट्रक ताब्यात 60 लाखांचा मुद्देमाल जप्त; तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाची कारवाई

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.26नोव्हेंबर):-रात्रीच्या दरम्यान अवैधरित्या अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या एका हायवासह दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हि कारवाई गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने बुधवार रोजी मध्यरात्री केली.दरम्यान मागील काही महिण्यापासून महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करत असून यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरि ’ वाळू उपसा करुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते.

नदीपात्रात पाणी असताना देखील वाळू माफिया केनीच्या सहाय्याने दिवसभर वाळू उपसा करुन ती रात्री हायवा व ट्रकमधून चोरट्या मार्गाने वाहतूक करतात. याविरोधात महसूल , पोलिस प्रशासन सातत्याने कारवाई करत असताना देखील वाळू माफिया या कारवायांना भीक घालत नसून महसूल, पोलिस अधिकार्‍यांवर पाळत ठेवून वाळू उपसा व वाहतूक करतात.बुधवार रोजी रात्री अशाचप्रकारे गेवराई तालुक्यातील सुरळेगाव याठिकाणाहून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार सचिन खाडे यांनी पथकासह त्याठिकाणी धाड टाकली. यावेळी एक हायवा, दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

क्राईम खबर , महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED