मुकबधिर विद्यालय येथे “माझे संविधान – माझा अभिमान “उपक्रम संपन्न

26

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.26नोव्हेंबर):-आज दि.२६ रोजी भारतात सर्वत्र संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जवाहर शिक्षण प्रसारक संचलित के.जी.गुजराथी मूकबधिर विद्यालय, मतिमंद निवासी निवासीअनिवासी विद्यालय , मूक बधिर निवासी कार्यशाळा धरणगाव येथे”माझे संविधान – माझा अभिमान “उपक्रम राबविण्यात आला.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रास 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान भारतास अर्पण केले. त्यानिमित्ताने संविधान दिन साजरा करीत आहोत. शासन निर्णय दिनांक 23 नोव्हेंबर 2021 ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत “माझे संविधान माझा अभिमान” हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ धरणगाव संचलित, केजी गुजराथी मूक बधिर विद्यालय ,मतिमंद निवासी अनिवासी विद्यालय ,मूक बधिर निवासी कार्यशाळा येथे आज संविधान दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

त्यात दि.२५/११/२०२१ रोजी रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच आज दि.२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.व विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस विधीज्ञ ॲड.संदिप पाटील, ॲड.नंदन पाटील यांनी संविधान व कायदे विषयक माहितीपर मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन विशेष शिक्षक आर.एच.पाटील सर, तसेच आभार प्रदर्शन मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील सर यांनी केले कार्यक्रमाचे मार्गदर्शन मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव सर यांनी केले.सदरील कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.‌‌