संविधान दिन तालुका काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात साजरा

29

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.26नोव्हेंबर):- आज दि.२६ नोव्हेंबर रोज काँग्रेस जनसंपर्क येथे संविधान दिन साजरा करण्यात आले.२६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले.

भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. खूप भाषा, शेकडो विधी आणि हजारो विधानं आहेत या सर्वांना जोडून ठेवणार आपला संविधान आहे. देशाच्या राज्यघटनेने स्वतंत्र मतं मांडण्याचा,बोलण्याचा हक्क आपल्याला दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज घटकांचा विचार करून संविधानाची रचना केली.

न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता ही मूल्ये आपल्याला दिली.’भारतीय संविधान दिना’च्या हार्दिक शुभेच्छा! यावेळी उपस्थित काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गणपतजी आडे, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस कंटू कोटनाके, माजी उपाध्यक्ष नप.अशपाक शेख, तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक जब्बार शेख, मारू पा. नैताम आदिवासी नेते, शहराध्यक्ष युवक काँग्रेस आशिष डसाने,डॉ.अंकुश गोतावळे, माजी उपाध्यक्ष दत्ता राठोड, विलास पवार, रोहिदास आडे, विलास वाघमारे, विष्णू रेड्डी, सुनिल शेळके, मारोती बटलाळे, मुंझाजी गायकवाड, विनायक राठोड, गावर्धन चव्हाण, साहेबराव राठोड, मारोती कुमरे, अनिल चव्हाण, प्रकाश पवार व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.