संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांच्या कार्यालयात संविधान दिन साजरा

✒️नायगांव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगांव बाजार(दि.26 नोव्हेंबर):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नायगांव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे ,व दिल्ली पोलीस, पोलीस असिस्टंट पी.एस.आय प्रमोद कांबळे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर 26 नोव्हेंबर मधील शहीद पोलीस बांधवांना एक मिनिट स्तब्ध उभे राहुन आदरांजली अर्पित करण्यात आले.

यावेळी रोटी फाउंडेशन भारत – मराठवाडा अध्यक्ष शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर, रोटी फाउंडेशनच्या मराठवाडा महिला अध्यक्षा- शामलताई कळसे, गंगाधर बडूरकर, राजेंद्र वाघमारे शेळगांवकर, विश्वनाथ पाटील खराडे , संग्राम बेलकर, गजानन वाघमारे वंजरवाडीकर, इंगळे गणपत ताकबिडकर, प्रदीप जोंधळे लालवंडीकर, अविनाश गायकवाड देगांवकर, गोविंद पोतदार तळणीकर, सूर्यवंशी मामा, सचिन फुलारी ,पिराजी वाघमारे , सुभाष पांचाळ , अमोल वाघमारे, भगवान हनवटे हंगरगेकर , विठ्ठल भेंडेकर , श्रीधर सूर्यवंशी, आदींची उपस्थिती होती, कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला,

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED