मांडवा येथे संविधान दिनानिमित्त संविधान घराची स्थापना

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.26नोव्हेंबर):-तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय मांडवा येथे ७२व्या संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चार्वाक वनांचे संस्थापक अध्यक्ष तथा ॲड .अप्पाराव मैंद हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे सरपंच सौ.अल्का ढोले, उपसरपंच विजय राठोड, पो.पा.दत्तराव पुलाते,तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, ग्राम सदस्य गोपाल मंदाडे, संगिता गजभार,हे उपस्थित होते.

या मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच यावेळी ॲड .अप्पाराव मैंद यांनी मार्गदर्शन केले. आणि ग्रामपंचायत कार्यालयास भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली.

त्यानंतर सम्यक संबोधी बुध्दविहार येथे संविधान घराची स्थापना करण्यात आली.

यावेळी राघोजी ढोले, दगडुजी ढोले, महादेव डोळस,तुकाराम चव्हाण, मनोहर चव्हाण, सुदाम ढोले, भिमराव ढोले, गौतम खंदारे,नथ्थुजी ढोले,प्रकाश ढोले, भारत ढोले, रमेश ढोले, कैलास राठोड, कैलास खडसे,प्रभाकर ढोले,किरण ढोले, विठ्ठल आडे, सिध्दार्थ ढोले, दयाशिल ढोले, गजानन आबाळे, बाळु पुलाते,ग्रा.पं.कर्मचारी प्रदुम्न आबाळे, शेषराव जाधव,सुदर्शन वानखेडे,महादेव माटे,पांडुरंग साखरे,तसेच ईत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत ढोले यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल राठोड यांनी मानले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.