संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रति अधिका-यांना भेट

30

🔹भीम टायगर सेनेचा उल्लेखनीय उपक्रम

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.26नोव्हेंबर):- – आज २६नोव्हेंबर संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे त्यानिमित्त भिमटायगर सेनेकडून सविधान दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला शहरातील वेगवेगळय़ा कार्यालयातील अधिकाऱ्यांना संविधानाच्या प्रति भेट देण्यात आल्या हा उल्लेखनीय उपक्रम भीम टायगर सेनेने आजच्या दिवशी केला सर्व प्रथम उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सावन कुमार ,पुसद नगर परिषद मुख्याधिकारी डॉ . किरण सुकलवाड वसंत नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण नाचणकर या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन भिम टायगर सेनेच्या वतीने भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांच्याकडून वरील संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रति सप्रेम भेट देण्यात आल्या .

२६ नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या देशाचे संविधान लागू करण्यात आलेले आहे त्या दिनाचे औचित्य साधून भिम टायगर सेनेच्या वतीने विविध कार्यालयास संविधानाच्या प्रति सप्रेम भेट देऊन संविधानाप्रति आपली असलेली एकता व अखंडता याची जाणीव राहावी याकरिता या उपक्रमाचे भिम टायगर सेनेच्या वतीने आयोजन करण्यात आले यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे पं.स. देवेंद्र खडसे , बाबाराव उबाळे, गजानन हिंगमिरे ,अण्णा दोडके गौतम खडसे ,प्रभाकर खंदारे ,राजकुमार पठाडे, अविनाश कांबळे ,प्रसिक खडसे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.