रक्षक असोसिएशन यांच्या वतीने जि प प्रा शाळा लाडेवडगाव येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

49

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी,बीड)मो:-8080942185

केज तालुका(दि.२६नोव्हेंबर):- रोजी आज संपूर्ण भारताने स्वातंत्र्य समता व बंधुता यांचा अवलंब केला ते म्हणजे लोकशाही होय. कारण आजच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाला लोकशाही रुपी भारतीय संविधान राष्टाल अर्पंण केले.म्हणून आज पासून आपल्या संपूर्ण भारतात २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पासून भारतीय संविधान अमलात आले. म्हणून आज रक्षक असोसिएशन यांच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या साठी सर्व प्रथम शाळेत राष्ट्रगीत व संविधानाचे वाचण करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आलेल्या सर्व पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामी सर यांनी केले तर गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे सर यांनी आपल्या भाषणात रक्षक असोसिएशन यांचे आभार मानले. शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे चांगले काम करावे व शाळा प्रगतीपथावर घेऊन जावे असे सांगितले. पशु संवर्धन अधिकारी मसणे सर, केंद्र प्रमुख तोंडे सर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी नागरगोजे सर, संजय बनसोडे यांचे स्वीय सहाय्यक किरण (भाऊ)सातपुते, पशुधन अधिकारी आडस मसणे साहेब, केंद्र प्रमुख तोंडे सर, केंद्र मुख्याध्यापक शेळके सर, तहसील प्रतिनिधी चव्हाण मॅडम, केंद्रेवाडी सरपंच अभय केंद्रे, अॅड लाड साहेब, ग्रामसेवक तोडकर साहेब शाळेचे मुख्याध्यापक धिरे सर, शाळेचे सर्व शिक्षक व रक्षक असोसिएशन चे सर्वेसर्वा बालासाहेब शेप , संजय बनसोडे मीत्र मंडळाचे अध्यक्ष राहुल शिंदे, उत्रेश्वर शेप तसेच पत्रकार घाडगे रंजीत, पत्रकार नवनाथ पौळ, व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.