सरकारनगर येथे पटांगण सुशोभीकरण, रंगमंच निर्मिती आणि हायमास्टचे भूमिपूजन

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(ता.26नोव्हेंबर):- सरकार नगर येथील हनुमान नगरातील पाण्याच्या टाकीजवळ पटांगण सुशोभीकरण, रंगमंच निर्मिती आणि हायमास्ट लावण्याच्या कामाचे भूमिपूजन महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्या हस्ते पार पडले. महानगरपालिकेच्या विकास निधीतून 23 लाखांच्या खर्चातून या कामांची निर्मिती होणार आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप आवारी हे सरकार नगर या प्रभागातून मागील तीन वेळा नगरसेवक झालेले आहेत.  प्रभागाच्या विकासासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. सर्वसामान्य नागरिकांना ते मदत करतात. संदीप आवारी यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू, असे गौरवोद्गार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक अरविंद मूचूलवार यांनी केले.

भूमिपूजन कार्यक्रमाला बतुलवार, जीवन मेश्राम, नारायण देवतळे, डॉक्टर पंदीलवार, जयंत गादेवार, घोडमारे, राजेश महिंद्र नन्नावरे, कार्लेकर काकू, उषाताई आसुटकर,  हनुमंते काकू, सौ. बारपत्रे, सौ. मत्ते, सौ. बत्तूलवार, सौ. घोडमारे, सौ. देवतले, सौ. गादेवार, सौ. चेतना भोयर, अभिषेक मत्ते, नामदेव  वर्गणे, दत्तुभाऊ कडूकर यांची उपस्थिती होती.