महावितरण कंपनीची अराजकता खपवून घेतली जाणार नाही– मा.आमदार विजयराज शिंदे

83

🔸तोडलेले विज कनेक्शन तात्काळ जोडा; अन्यथा महावितरण कंपनीचा माज उतरवू

🔹भाजपा तालुका किसान मोर्चाच्या वतीने महावितरण विरोधात धरणे आंदोलन

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.27नोव्हेंबर):– महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू केलेला आहे.टाळेबंदीने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे व नैसर्गिक आपत्तीने खरिपातील शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिसकावल्या गेला आहे.आणि आता ऐन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यां कडून सक्तीने विज बिल वसुली सुरू केली आहे तर विज भरू न शेतकऱ्यांचे विज कनेक्शन महावितरणने कापल्याचा सपाटा लावला आहे. या महावितरणच्या कारवाई विरोधात आज भाजपा तालुका किसान मोर्च्याच्या वतीने मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथे महावितरणच्या अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर धरणे केले व राज्य सरकारचा तिव्र निषेध व्यक्त केला.

धरणे आंदोलनात किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दिपकजी वारे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनीलजी देशमुख, महिला मोर्च्या जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड मोहन पवार, कीसान मोर्च्याचे तालुकाध्यक्ष सुभाष जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.धरणे आंदोलनात राज्यसरकार व महावितरण च्या भोंगळ कारभारा विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शेतकरी विरोधी सरकारचा निषेध नोंदवला गेला व सक्तीची विज बिल वसुली थांबवून विज कनेक्शन तत्काळ जोडण्याची मागणी लावून धरण्यात आली.

यावेळी अधिक्षक अभियंता श्री.संजय आकोडे याना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेराव घालून या अनागोंदी कारवाई बद्दल जाब विचारला. यावेळी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी “शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्याना मदत करणे ऐवजी हे सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे, ऐन रब्बीच्या हंगामात मोक्याचे दिवस असताना महावितरण शेतकऱ्यांकडून सक्तीने विज बिलांची वसुली करत आहे कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचे विज कनेक्शन कापत आहे महावितरणची ही अराजकता व मोगलाई आम्ही खपवून घेणार नाही,तात्काळ बंद केलेले विज कनेक्शन सुरू करा अन्यथा सरकारचा व महावितरणचा माज आम्ही कायदा हातात घेऊन उतरवू असा परखड इशारा यावेळी त्यांनी दिला.

यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दिपकजी वारे, तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, सौ.सिंधुताई खेडेकर ,किसान मोर्च्या तालुकाध्यक्ष सुभाष जगताप,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,भाजयुमो तालुका सरचिटणीस सतिश भाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. तालुकाध्यक्ष सुनील देशमुख यांनी “महावितरण कंपनी शेतकऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याप्रमाणे विज कनेक्शन कापत आहे, देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळात अश्या प्रकारे एकाही शेतकऱ्यांचे कनेक्शन कापल्या गेले नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयात काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता.भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते अनावर होण्याची स्थिती असतांना मा.आमदार विजयराज शिंदे यांनी महावितरणला शेवटचे निवेदन असल्याचे सांगत यानंतर गुन्हे दाखल झाले तरी चालतील आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा दिला.

प्रमुख मागण्यांसोबतच नादुरुस्त ट्रान्सफार्मर तात्काळ दुरुस्त करा,दररोज 15 तास शेतकऱ्याना वीजपुरवठा करा,ग्रामीण भागात दिवस व रात्र सिंगल फेज लाईन सुरू ठेवा अश्या विविध मागण्यांचे निवेदन तालुका किसान मोर्च्या चे तालुकाध्यक्ष सुभाष जगताप यांच्या वतीने सादर केले गेले.

या धरणे आंदोलनात भाजपा महिला सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सौ.नंदिनीताई साळवे,कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विश्राम पवार, शहर सरचिटणीस अनंता शिंदे, भाजयुमो तालुका सरचिटणीस यश तायडे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ.उषाताई पवार, महिला तालुकाध्यक्ष मायाताई पवार, सखाराम नरोटे, बाळू ठाकरे, दत्तात्रय शिंदे, झ्यामसिंग भोपळे, अमोल देवकर, नगरसेवक गोविंद सराफ, सोपान जगताप, कुलदीप पवार,प्रदीप सोनटक्के,प्रकाश राजगुरे, गोविंदा खिल्लारे,भिकाजी पदमने,चंद्रकांत पाथरकर, प्रदीप तोटे यांसह भाजपा कार्यकर्ते व असंख्य शेतकरी उपस्थित होते.