शासकीय औ.प्र. संस्थेत संविधान दिन संपन्न…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.27नोव्हेंबर):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षपदी संस्थेचे प्राचार्य संतोष सांळुके होते. सर्व प्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक गणित निदेशक बंडोपंत बोढेकर यांनी केले.

तर संविधान प्रास्ताविकातचे वाचन आणि उपस्थितांना शपथ कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम यांनी दिली. प्राचार्य सांळुके यांनी राज्य घटना संबंधित मौलिक विचार मांडत नागरिकांचे अधिकार आणि जबाबदारी यावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन संतोष बोंद्रे यांनी केले. कार्यक्रमास सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थीं उपस्थिती होते.

महाराष्ट्र, शैक्षणिक, सांस्कृतिक
©️ALL RIGHT RESERVED