लाईफ फाऊंडेशन ,व चंद्रपूर जिल्हा आष्टेडु मर्दानी आखाडा असोसिएशन आणि ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन, मार्फत “संविधान दिन” उत्साहात साजरा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26नोव्हेंबर):-संविधान दिनाचे औचित्य साधून आज दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी शुक्रवारला ब्रम्हपुरी शहरातील सामाजिक कार्य करणारी लाईफ फाऊंडेशन संस्था आणि कराटे असोसिएशन मार्फत ब्रम्हपुरी मधील लोकमान्य टिळक शाळेच्या भव्य पटांगणावर सायंकाळी ६ वाजता संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रास्ताविकाच्या फोटोला पुष्प अर्पण करून, कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसोबत संविधान प्रास्ताविकाचे एकत्रितरित्या वाचन करण्यात आले.

सोबतच २००८ मध्ये झालेल्या मुंबई मधील दहशतवादी हल्ल्यातील वीर जवानांना आणि निष्पाप लोकांसाठी दोन मिनिटांचा मौन साधना घेत, श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सदर कार्यक्रमास लाईफ फाऊंडेशच्या महिला सचिव पूनम कुथे, सदस्य श्रुती मेश्राम, अध्यक्ष उदयकुमार पगाडे आणि कराटे असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक सिहान गणेश लांजेवार सर, सेंसाई क्रिष्णा समरीत, सेंसाई सचिन भानारकर, सेंसाई प्रितम राऊत, सेंसाई भाग्यवान शास्त्रकार इत्यादी लोक उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED