डॉ. आंबेडकर विद्यापीठाचा आदर्श जगासमोर राहील- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत

52

✒️नितीन राजे(सातारा-खटाव प्रतिनिधी)

सातारा(दि.27नोव्हेंबर):-लोणेरे तालुका माणगाव जिल्हा रायगड विद्यापीठ परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते झाले याचा आनंद वाटतो आहे. हा समारंभ माझ्या हस्ते व्हावा म्हणूनच की काय मी उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री झालो. लोणेरे विद्यापीठाला यापुढे बाटु न म्हणता हे विद्यापीठ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशाख विद्यापीठ नावाने ओळखला जावा असा आदेश आपल्याकडून लवकरच काढला जाईल असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याहस्ते झाले. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खा.सुनील तटकरे, आ. भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अनिरुद्ध पंडित, राजिपचे माजी सभापती अँड. राजीव साबळे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, राजिप सदस्या अमृता हरवंडकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, सुजित शिंदे, बौद्ध धम्म सामाजिक संस्था माणगाव संस्थापक पंकज तांबे, तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे माजी पंचायत समिती सदस्य नथुराम करकरे, प्रकाश टेंबे, संजय घोसाळकर, विद्यापीठाचे प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वृंद, पालक, नागरिक व विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. सामंत पुढे म्हणाले कि, विद्यापीठाचे व लोकप्रतिनिधींचे संवाद महत्वाचा आहे. स्थानिक आमदार, पालकमंत्री, खासदार यांच्या निधीतून विद्यापीठाचे बरेचसे प्रश्न मार्गी लागू शकतात. ब्या बॅरिस्टर अंतुले या विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाला गेल्या पाच वर्षात आपण २० कोटींचा निधी दिला असून यापुढेही २५ कोटी रुपये विद्यापीठाला देण्याची जबाबदारी भी स्वीकारली आहे. या विद्यापीठ परिसरात लवकरच आपण शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करू. या पुतळ्याचे काम जानेवारी महिन्यात सुरु करून पुढील संविधाना दिवशी या पुतळ्याचे अनावरण आपण करू. असे ही तेम्हणाले. जगातील एक आदर्श असे विद्यापीठ आपल्याला तयार करायचे असून या विद्यापीठातून चांगले विद्यार्थी घडावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री आदिती तटकरे आपल्या मार्गदर्शनात बोलताना म्हणाल्या, लोणेरे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज संविधान दिवशी आपण मोठ्या प्रमाणात हा समारंभ साजरा करीत आहोत. खा. सुनील तटकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. २६ जानेवारीला देश प्रजासत्ताक झाला. लोणेरे विद्यापीठ हे जगातील नामवंत असे विद्यापीठ असून रायगड जिल्ह्याची एक शान असल्याचे सांगितले. आ. भरत गोगावले म्हणाले विद्यापीठाला मोठ्याप्रमाणात जागा देणाऱ्या शेतकन्यांच्या कुटुंबीयांचाही विचार झाला पाहिजे.

या विद्यापीठ आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. या समारंभाचा प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी केले. सदर भव्यदिव्य असा समारंभ उत्साहात पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अनिरुद्ध पंडित, कुलसचिव प्रा. डॉ. भगवान जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच प्रज्ञापक वर्ग, कर्मचारी वृंद, विद्याथ्र्यांनी मेहनत घेतली.