ग्राम पंचायत शेगाव येथे संविधान दिन साजरा…

69

✒️मनोज गाठले(शेगाव बू प्रतिनिध)मो:-9767883091

शेगाव(दि.27नोव्हेंबर):-स्थानीक शेगाव येथील ग्राम पंचायत शेगाव बू येथे संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून येथील सरपंच श्री सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून भारताचे संविधान प्रास्ताविक चे वाचन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक श्री अनंता आखाडे यांनी या दिनाचे महत्व पटऊन दिले. या कार्यक्रमला ग्राम पंचायत सदस्य श्री यशवंत लोडे, माजी सरपंच श्री सागर कामडी, श्री शंकर घोडमारे, सौ माया आत्राम, सौ जोशना फुलकर, सौ मनीषा घोडमारें, सौ कविता निखारे आदी गावकरी शाळेचे शिक्षक वृंद, गावकरी मंडळी उपस्थित होते .