धरणगाव इंदिरा गांधी विद्यालयात साजरा झाला संविधान दिन

32

🔸आपले संविधान – आपला आत्मसन्मान – प्रा.भरत शिरसाठ

🔹राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवनकार्य प्रेरणादायी – पी.डी.पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.27नोव्हेंबर):- येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ‘ माझे संविधान,माझा अभिमान ‘ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एस.पाटील हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे तर प्रमुख वक्ते प्रा.भरत शिरसाठ व पी.डी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक बळवंत पाटील,जी.पी.चौधरी हे होते.

यावेळी विद्यायात रांगोळी,निबंध लेखन,वकृत्व व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते पी. डी.पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव करीत भारतीय संविधानाच्या ३९५ कलम व गुरू शिष्य परंपरा यांची ओळख उपस्थितांना करुन दिली तसेच दुसरे वक्ते प्रा.भरत शिरसाठ यांनी भारताचे संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल उपस्थितांना माहिती दिली तसेच आरक्षण या बद्दल युवकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन एस.बी.पाटील यांनी केले.पाहुण्यांचा परिचय एस.एम.देशमुख यांनी केला. संविधानाचे वाचन बी.बी.पवार यांनी तर आभार एस.ए.शिरसाठ यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विज्ञान विभागाचे डी.बी.बोरसे,ए.एस.सुर्यवंशी,पी.पी.पाटील,के.एन.पाटील,पी.डी.पवार,ए.एम. गावीत,पी. एल. झुंझारराव व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.