वंचित बहुजन आघाडी ब्रम्ह्पुरी तर्फे संविधान दिन साजरा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी (दि.27 नोव्हेंबर):-संपूर्ण भारत देशात 26 नोव्हें. ला भारतीय संविधान दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असुन , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी जो मानवतावादी संविधान दिला त्याचा गौरव म्हणुन 26 नोव्हें. ला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. या दिवसाचे औचित्य साधुन वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्ह्पुरी च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .

याशिवाय कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर डॉ बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुखदेव प्रधान जिल्हा सदस्य ,प्रमुख अतिथि डॉ प्रेमलाल मेश्राम जिल्हा सदस्य , डॉ रविंद्र मेश्राम , पंडितजी गायकवाड , प्रा.डॉ.आर बी मेश्राम , प्रमोदजी जिवतोडे शिक्षक , जयरामजी बगमारे ओबीसी कार्यकर्ते , सौ.मनीषाताई उमक , सौ.भुते म्याडम सेवानिवृत्त शिक्षिका यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अनिल कांबळे उपाध्यक्ष तर आयोजन व आभार प्रदर्शन ता.महासचिव लिलाधर वंजारी यांनी केले.तसेच अश्वजीत हुमने ता.सचिव , कमलेश मेश्राम ता.सल्लागार यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी डॉ.राहुल मेश्राम , नरेंद्र मेश्राम , अरुण सुखदेवे , डॉ विलास मैंद , यशवंत मेश्राम , निहाल ढोरे , प्रफुल ढोक, पंढरी फुल्झेले , नगराळे सर , डी टी सोन्दर्कर , युवराज राखाडे , रवि दिघोरे अन्य असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED