अवैध रित्या मुरुम उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई करा

26

🔸शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांची मागणी

✒️जिवती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जिवती(दि.29नोव्हेंबर):- जिवती तालुक्यात धडाक्याने पंतप्रधान ग्रामसडक योजना – मुख्यमंत्री ग्रामसडक योजना इतर योजनेअंतर्गत रस्त्याचे, पुलिया निर्माण करण्याचे काम जिवती तालुक्यातील ग्रामीण भागात मागील एक वर्षापासुन जिवती ते देवलागुडा- लोलडोह- पाटागुडा ते चिखली पर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे.

या कामाला लागणारा मौल्यवान मुरुम हजारो ब्रास जंगलातून उत्खनन करून रस्त्याच्या कामाला वापला जात असुन या अवैध रित्या मुरुम उत्खननाकडे वनपरिक्षेत्र अधिकारी, बीट अधिकारी, वनरक्षक जानीव पुर्वक दुर्लक्ष करण्याचे काम करत असताना दिसत आहे. एखाद्या गरजू व्यक्तींनी घराच्या बांधकामासाठी एखादा ब्रास मुरुम किंवा घराला लागणारे लाकुड जंगलातून आणले तर त्याच्यावर कारवाई करतात किंवा त्याला कारवाईची भिती दाखवून त्यांच्या कडुन पैसे घेऊन सोडून देतात मग या रस्त्याच्या कामाला हजारो ब्रास अवैध रित्या मुरुम जंगलातून उत्खनन करून रस्त्याच्या कामाला मुरुमाचा वापर संबंधित ठेकेदार करत असुन सुद्धा या ठेकेदारा कारवाई का करण्यात येत नाही असे प्रश्न विचारले जात आहे.

अशी माहिती चर्चेतून समजते की मुरुम उत्खनन करताना वनपरिक्षेत्र अधिकारी जिवती यांनी. एक जिसीपी- एक रोरल मशिन ( दबाई मशिन ) जप्त करण्यात आली होती? ती जप्त केलेली मशिनरी वाहने परत करण्यात आली अशीही चर्चा सध्या सुरू आहे कारवाई झालीतर परत कशी का करण्यात आली? लक्ष्मी दर्शनाचे देवान घेवाण झाल्याची चर्चा परिसरात रंगली असल्याची माहिती समोर आली आहे.

जिवती – देवलागुडा – लोलडोह – पाटागुडा ते चिखली रस्त्यावर अवैध रित्या मुरुम उत्खनन करुन एक – एक ब्रासचे ढिगारे साठवून ठेवले आहे व शेकडो ब्रास मुरुम रस्त्याच्या कामाला वापरण्यात आले आहे या सर्व अवैध रित्या जंगलातून मुरुम उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही व मौल्यवान मुरुम जप्त करण्यात आले नाहीतर संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी, वनबीट अधिकारी, वनरक्षक यांच्या विरोधात वनमंत्री महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर जिल्हाधिकारी तथा चंद्रपूर जिल्हा मुख्य वनअधिकारी यांच्या कडे निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सय्यद शब्बीर जागीरदार तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना तालुका जिवती च्या वतीने करण्यात आला आह