वामनराव पाटील स्मृती प्रेरणा पुरस्कार उषाकिरण आत्राम यानां प्रदान

✒️नितिन पाटील(नेरी प्रतिनिधी)

चिमूर(दि.28नोव्हेंबर ):- तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर स्वयंसेवी संस्था वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जानारा वामनराव पाटील स्मृती प्रेरणा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिका लेखक व कवी उषाकिरण आत्राम यानां प्रदान करण्यात आला.

विदर्भ हिंदि साहित्य भवन नागपूर येथे आयोजित भव्य समारोहात हा पुरस्कार त्यानां अविरत साहित्यसेवा आणि आदिवासी संस्कृती च्या शोधपुर्ण कार्यासाठी प्रदान करन्यात आला. वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष भुपेश वामनराव पाटील व सदस्य नितीन वामनराव पाटील यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्विकारतानां त्यानीं वामनराव पाटील यांच्या सामाजिक कार्यक्रमातील पुढाकार व योगदानाबाबतच्या स्मृतीनां उजाळा दिला व प्रतिष्ठान चे कार्य प्रेरणादायी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. उषाकिरण आत्राम यांच्या चार पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी अध्यक्षस्थानी आदिवासी समाजचिंतक वासुदेवजी डहाके तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध नाट्यलेखक सतीशजी पावडे वर्धा, नागपूर विद्यापीठ इतिहास विभाग प्रमुख प्रा. शाम कोरेटी, अधिवक्ता लालसु नागोटी गडचिरोली, प्रा. वैजनाथ अनमुलवाह नांदेड हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठि प्रसिद्ध लेखक निलकांत कुलसंगे प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत ,नाटककार संजय जिवने इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. या भव्य कार्यक्रमात विदर्भातील सर्व जिल्ह्यातुन सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक कवी व लेखक सहभागी झाले होते..

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED