देशात संविधान संस्कृती निर्माण व्हावी – डॉ. प्रेम हनवते

28

🔸एमपीजेच्या संविधान परिचय कार्यक्रमात प्रतिपादन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.27नोव्हेंबर):-’26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या देशाने संविधान सभेव्दारा निर्मित नव संविधानाचा स्वीकार केला या घटनेला आज 71 वर्ष पूर्ण होत आहेत.भारत देशाचे सार्वभौमत्व, प्रजासत्ताक लोकशाही गणराज्याची एकता आणि अखंडता टिकविण्याचे महत्वपूर्ण कार्य भारतीय संविधानाने उत्तम प्रकारे केलेआहे. त्यामुळेच आपल्या देशात सांसदीय लोकशाही टिकूनआहे.एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्ये प्रदान करून सर्व भारतीय नागरिकांना न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुतेची ग्वाही देत विकासाची समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या सविधानामुळेच आपण आज सुरक्षित आहोत.

देशात अराजकता माजवून संविधान आणि लोकशाही मूल्यांना सुरुंग लावू पाहणाऱ्या विध्वंसक प्रवृत्ती ला रोखण्यासाठी देशात संविधान संस्कृती वाढीस लागण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन संविधानाचे अभ्यासक डॉ प्रेम हनवते यांनी केले.मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस या संघटने द्वारा आयोजित संविधान दिना निमित्त संविधान परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. सुमारे चाळीस मिनिटांच्या त्यांच्या भाषणातून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा, संविधान निर्मितीचा इतिहास सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले.

या प्रसंगी साहित्यिक प्रा.डॉ.अनिल काळबांडे यांनी ‘सर्व भारतीयांना माणसासारखे जीवन जगता यावे ,सर्वांचा विकास व्हावा म्हणून भारतीय संविधानाने बजावलेली भुमीका विशद केली.पुरोगामी युवा ब्रिगेडचे प्रवक्ते शाहरूख पठाण आणि प्रा गजानन दामोधर यांनी भारतीय संविधानाने आम्हांला काय दिले आणि आपण संविधानिक मूल्यांचे पालन करणेकसे आवश्यकआहे या बद्दल सविस्तरपणे माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन फिरोज अन्सारी(जिल्हाध्यक्ष एम. पी. जे.)यांनी केले, प्रास्तविक मोहसीन राज ( अध्यक्ष mp j ) यांनी, तर संविधान उद्देशिकेचे वाचन डॉ.फारूक अबरार यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून मंचावर दत्ता काळे, अ .रउफ नदवी, आसिफ अन्सारी, रिजवान खान, कासीम अली आदि मान्यवर विचारमंचावर उपस्थिती होते. या कार्यक्रमास शहरातील विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्तार शहा, जरीब खान, सर्फराज अहेमद, अ . जहीर, मिनाज अहेमद, समीर मुस्तफा, तस्लीम अहेमद, आसीफ शेख, सिराज खान यांनी परिक्षम केले.