लोकनेते स्व.अ‍ॅड.अनंतराव देवसरकर यांच्या प्रथम स्मृति दिन निमित्ताने दिव्यांगना साहित्याचे वाटप

40

✒️अमोल उत्तम जोगदंडे(तालुका प्रतिनिधी)मो:-8806583158

उमरखेड(दि.28नोव्हेंबर):- लोकनेते स्व. अ‍ॅड. अनंतराव देवसरकर यांच्या प्रथम स्मृतिदिना प्रित्यर्थ,उमरखेड तालुक्यातील 965 दिव्यांगांना 1406 विविध प्रकारचे सहाय्यक साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेच्या माध्यमातून गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेड च्या प्रांगणात करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना. श्रीमती यशोमती ताई ठाकुर मुख्य अतिथी म्हणून लाभलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सामाजिक न्याय मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे भूषविले.या कार्यक्रमात ९६५ दिव्यांग बंधू भगिनी आणि बालकांना १४०६ जे विविध प्रकारचे सहाय्यक साहित्य वितरित करण्यात आले.

यात श्रवण यंत्र- 355, ट्रायसिकल -194 , मोटराईज व्हीलचेअर – 136, वॉकिंग स्टीक- 230,स्मार्टफोन -23,कृत्रिम हात व पाय -94, रोलेटर- 1,डेझी प्लेयर -22,ब्रेल कीट- 4, लेप्रसी कीट – 4,क्रच – 105 यासह 1406 साहित्य विविध साहित्याचा समावेश होते.

ना. माणिकराव ठाकरे, माजी आमदार, श्री. प्रकाश पाटील देवसरकर, विजयराव खडसे, राजेंद्र नजरधने, गोदावरी उद्योग समुहाच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई हेमंत पाटील, नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या अध्यक्ष सौ.जयश्रीताई पावडे, माजी बांधकाम सभापती तातूभाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, राष्ट्रवादी लीगल सेल चे प्रमुख अ‍ॅड.आशिष देशमुख यांच्यासह जिल्हाभरातील सामाजिक – राजकीय, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या अतिशय नियोजनबद्ध व देखण्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सर्व संचालक, सर्व कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.