वडसीतील पांदन रस्ते खडीकरणाच्या प्रतीक्षेत

28

🔺शेतकरी प्रचंड हैराण

🔺रस्त्यावर जागोजागी पडले खड्डे

🔺खडीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी

✒️प्रतिनिधी नेरी(नितीन पाटील)

चिमूर(दि.28नोव्हेंबर):- तालुक्यातील वडसी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जांभूळे ते रुपचंद मेश्राम यांच्या शेतापर्यत जाणारा पांदन रस्ता ,उमा नदी ते हतीगोटा पर्यत जाणारा पांदन रस्ता,दिगाबर जांभूळे यांच्या शेतापर्यत जाणारा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.पांदण रस्ते खडीकरणाच्या प्रतीक्षेत असून शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.रोहयो अंतर्गत २००६ मध्ये गोडमोहाळी पांदन रस्त्याचे मातीकाम करण्यात आले.पांदण रस्ता बांधून जवळपास पंधरा वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप रस्त्यावर मुरुम टाकण्यात आले नाही.

या परीसरातील असाचं बराच रस्त्यावर पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्याने जाताना चिखल निर्माण होते. ट्रॅक्टर,बैलबंडीच्या ये-जा करण्यामूळे रस्त्यावर मुरुम नसल्याने खड्डे पडले आहेत . पावसाळ्यात शेतीची उपकरणे नेताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असते.पांदन रस्त्याचे काम झाल्यानंतर यांवर मूरुम गिट्टी टाकली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेतात थ्रेशर मशिन नेण्यासाठी धानाची दुलाई करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष केंद्रित करतील काय असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.