पाच लाख पंच्चेचालीस हजार रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त…

30

🔺पो.स्टे ब्रम्हपुरी पोलीसांकडून मागील काही महीन्यांपासून सतत प्रभावी छापेमारी कारवाया…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29नोव्हेंबर):-28 नोव्हेंबर रोजीचे रात्री ब्रम्हपुरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथुन एका फीक्कट ग्रे रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी गाडी
क एम एच १५ सी.एम २५७५ ने आरमोरी मार्गे दारु वाहतुक होणार आहे. अशी खबर मिळाल्याने तात्काळ ब्रम्हपुरी ते आरमोरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळ सापळा रचला ब्रम्हपुरी वरून आरमोरी दिशेकडे येणारी नमूद वर्णनाची महींद्रा स्कॉर्पिओ चारचाकी गाड़ी के एम एच १५ सी.एम २५७५ जातांना
दिसून आली.

सदर गाडीचालकाला पोलीस असल्याचा संशय आल्यावरून त्याने आरमोरी दिशेकडे गाडी भरधाव वेगाने पळवली पोलीसांनी सदर गाडीचा पाठलाग करीत असता सदरची महिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी गाड़ी क एम एच १५ सी.एम २५७५ च्या चालकाने खरकाडा फाटा येथे त्याची गाडी थांबवून अंधाराचा फायदा घेवून गाडीतील दोन इसम गाडी सोडून बाजुच्या शेतातून पळून गेले. पोलीसांना मिळून आलेल्या सदर चारचाकी वाहन क एम एच १५ सी. एम २५७५ वी पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये पुढीलप्रमाणे वर्णनाचा अवैध दारूसाठा व मुद्येमाल मिळून आला.

१) देशी दारू सखु संत्रा टॅगो कंपनीची प्रत्येकी १८० ml च्या सिलबंद ४८ बॉटल नुसार १५ बॉक्स
की अं ७५,००० रू.
२) देशी दारू सखु संत्रा उँगो कंपनीची प्रत्येकी ९० ml च्या सिलबंद १०० बॉटल नुसार ०७
बॉक्स की अं ३५,००० रू.
३) रॉकेट देशी दारू संत्रा प्रत्येकी ९० ml च्या सिलबंद १०० बॉटल नुसार २६ बॉक्स
की अं १,३०,००० रू
४) एक महींद्रा स्कॉर्पिओ चारचाकी गाडी क एम एच १५ सी.एम २५७५ की. अं ३,००,००० रू
५) एक Realme कंपनीचा मोबाईल फोन की अं ५००० रू
असा एकूण ५,४५,००० रू अवैध दारूसाठा व मुद्येमाल घटनास्थळी मिळुन आला फरार आरोपी
१) महींद्र मनोहर भर्रे रा. बेलपातळी ता.ब्रम्हपुरी २) महींद्रा स्कॉर्पिओ चारचाकी गाडी क एम एच १५ सी.
एम २५७५ हया गाडीचा चालक यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अ.८३ नुसार गुन्हा
दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिलींद शिंदे, पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री आशिष बोरकर, पो.उप.नि राजेश उंदीरवाडे,नापोका मुकेश गजबे, संदेश देवगडे, प्रमोद सावसाकडे चालक नाजुक चहांदे यांनी केली.चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी उठल्यानंतरही ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामीण परीसरात तसेच ब्रम्हपूरी येथून गडचिरोली जिल्हयामध्ये लपूनछपून अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहीती समोर येत असल्याने पो.स्टे ब्रम्हपुरी पोलीसांकडून मागील काही महीन्यांपासून सतत प्रभावी छापेमारी कारवाया करण्यात आल्या असून भविष्यातही प्रभावी कारवाया करण्यात येईल असे ब्रम्हपुरी पुलिस अधिकारी यांच्याकडून कळविण्यात आले.