महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने धरणगावात रक्तदान शिबिर संपन्न…

  40

  ?तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक उपक्रम

  ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

  धरणगांव(दि.29नोव्हेंबर):- धरणगाव शहरात २८ नोव्हेंबर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन व ६ डिसेंबर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले ब्रिगेड च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

  सर्वप्रथम धरणी चौकात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला सकाळी ८ वाजता माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर महात्मा फुले ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे (युवक) जिल्हाध्यक्ष जळगाव मनोज माळी यांच्या कडून करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष दादासो. विठोबा नामदेव महाजन, माजी नगराध्यक्ष नानासो. ज्ञानेश्वर महाजन, माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेश संपर्कप्रमुख धनराज एस. देवरे, जिल्हाध्यक्ष भिकन महाजन, जिल्हा सचिव सचिन माळी, भाजपाचे ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष एडवोकेट संजय महाजन, नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक कैलास माळी, द क्लिअर न्यूजचे संपादक विजय भाऊ वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते भैयाभाऊ महाजन, माळी समाजाचे सचिव गोपालभाऊ महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, हरीश डेडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

  या कार्यक्रमात सर्व फुले प्रेमींनी महा रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला कार्यक्रमात प्रमुख रक्तदाते – ललितभाऊ मराठे, जिभाऊ महाजन ,सचिन माळी मनोज माळी ,डी.एस देवरे, नितेश माळी ,नरेंद्र महाजन, तालुका कार्यकारणी तील पदाधिकारी उमेश महाजन, ऋषिकेश महाजन ,आकाश माळी, कैलास महाजन, व महात्मा फुले ब्रिगेडचे शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी व तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगाव
  वीरभूषण पाटील यांची टीमने सहकार्य केले.