शाहूवाडी तालुक्यातील डोणोली गावचे सुपुत्र अनिकेत कुंभार याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर निवड

  50

  ✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

  कोल्हापूर(दि.29नोव्हेंबर):-शाहूवाडी तालुक्यातील डोनोली गावचे सुपुत्र अनिकेत सहदेव कुंभार याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाल्याने गावाला पहिला सैन्य दलात अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला असे प्रतिपादन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोकराव पोवार यांनी केले.अनिकेत कुंभार याची राष्ट्रीय रक्षा अकॅडमी( एन डी ए) पुणे येथे भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदी निवड झाले बद्दल ग्रामस्थांनी घेतलेल्या सत्कार कर्यक्रमात पोवार म्हणाले अनिकेत हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याने सैन्य दलात अधिकारी व्हायचे हे ध्येय ठेवून जिद्द चिकाटीच्या जोरावर प्रामाणिक पणे त्याने आई, वडील व कुंटुबापसुन दुर राहून देशाच्या विविध राज्यातील सैनिकी शाळेत अभ्यास करून सैन्य दलात अधिकारी झाला.

  सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोकराव पोवार, डी वाय एस पी शिवाजी जमदाडे, व निवृत्त सुभेदार राजेश पाटील, शिवाजी पाटील, विलास पाटील, तुकाराम पाटील, मुख्याध्यापक रवींद्र कुंभार यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.प्रशिक्षण पूर्ण करून तो गावी आला या वेळी गावातून अनिकेत याची मिरवणूक काढण्यात आली या वेळी ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. त्यच्या यशाचा अभिमान ग्रामस्थांच्या चेहर्यावर दिसत होता.या वेळी योध्दा कमांडो रेस्क्यू फोर्से चे हवालदार संजय जांबिलकर, कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकारी सुरेश राठोड,अनिल पाटील, सरपंच जितेंद्र यशवंत, संपादक कमलाकर वर्टेकर, विश्वास पाटील व सैन्यदलातील आजी-माजी अधिकारी उपस्थित होते.

  चौकट
  देशसेवेचा वारसा असणारे कुंभार कुटुंब
  अनिकेत कुंभार याच्या कुटूंबा मध्ये सख्खे आजोबा लक्ष्मण कुंभार (वय ६१ ) यानी २० वर्षे, चुलत आजोबा आनंदा कुंभार (वय ६०) यांनी १८ वर्षे, वडील सहदेव कुंभार (वय ४५) यांनी २०वर्षे सैन्य दलात देशसेवा करून निवृत्त झाले आहेत अनिकेतच्या निवडीने तिसरी पिढी देशसेवेचा वारसा जपत आहे

  प्रतिक्रिया
  सैन्य दलात जायचेच हेच ध्येय ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्याने माझी निवड झाली. कुटुंबातील सर्वांचेच प्रोत्साहन मिळाल्याने आई ,वडील कुटुंबाचे व माझे स्वप्न पूर्ण झाले.
  अनिकेत कुंभार
  फोटो ओळ : डोणोली येथे लेफ्टनंट पदि निवड झालेल्या अनिकेत कुंभार यांचा नागरिक सत्कार सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोकराव पोवार, शिवाजीराव जमदाडे सुभेदार राजेश पाटील यानी केला.